भ्रमाचं जाळं - सत्याभास भाग १: चिरा (The Crack) रात्रीचे दोन वाजले होते. रोहनच्या डोळ्यांसमोर मॉनिटरवर हिरवी अक्षरं नाचत होती. 'प्रोजेक्ट फिनिक्स' डेडलाईन जवळ येत होती आणि तो सलग अठ्ठेचाळीस तासांपासून ऑफिसमध्येच होता. कॉफीचे रिकामे कप टेबलावर पसरले होते. तेव्हाच ते झालं. त्याच्या कोडच्या ओळींमध्ये, एका क्षणासाठी, एक विचित्र चिन्ह (symbol) चमकून गेलं. डोळ्याचा भास असावा. त्याने डोळे चोळले आणि पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. सगळं नॉर्मल होतं. "जास्त ताण झालाय," तो स्वतःशीच पुटपुटला. पण अर्ध्या तासानंतर, तेच चिन्ह पुन्हा दिसलं. यावेळी थोडं जास्त स्पष्ट. एक वर्तुळ, आणि त्यातून जाणाऱ्या तीन वाकड्या रेषा. त्याने बाजूला बसलेल्या समीरकडे पाहिलं. समीर हेडफोन लावून कामात बुडालेला. "समीर," रोहनने त्याला हलवलं. "काय?" समीरने वैतागून हेडफोन काढला. "तुला... तुला स्क्रीनवर काही वेगळं दिसलं का?" "वेगळं? म्हणजे? एरर??" "नाही... एक चिन्ह..." समीरने रोहनकडे विचित्र नजरेने पाहिलं. "रोहन, तू ठीक आहेस ना? जा, जरा फ्रेश होऊन ये. मला वाटतं त...
Hello, I'm writer by heart and game designer by profession.